[{"id":0,"title":"\u092e\u0941\u0916\u094d\u092f\u092a\u0943\u0937\u094d\u0920","page":"SM_PAGE1","type":"","url":"home","icon":"","children":[],"activeClass":""},{"id":28,"title":" \u0909\u092a\u0915\u094d\u0930\u092e","page":"SM_PAGE14","type":"","url":"-","icon":"","children":[{"id":19,"title":"\u0935\u0930\u094d\u0917","page":"SM_PAGE3","type":"","url":"classes","icon":"","children":[],"activeClass":""},{"id":24,"title":"\u0915\u093e\u0930\u094d\u092f\u0915\u094d\u0930\u092e","page":"SM_PAGE12","type":"","url":"events","icon":"","children":[],"activeClass":""},{"id":22,"title":"\u0938\u094d\u092a\u0930\u094d\u0927\u093e","page":"SM_PAGE11","type":"","url":"Competition","icon":"","children":[],"activeClass":""}],"activeClass":""},{"id":18,"title":"\u0906\u0917\u093e\u092e\u0940 \u0915\u093e\u0930\u094d\u092f\u0915\u094d\u0930\u092e","page":"SM_PAGE10","type":"","url":"upcoming-events","icon":"","children":[],"activeClass":""},{"id":16,"title":"\u092a\u094d\u0930\u0947\u0938 \u0930\u093f\u0932\u0940\u091c","page":"SM_PAGE9","type":"","url":"press-release","icon":"","children":[],"activeClass":""},{"id":26,"title":"\u0938\u0902\u092a\u0930\u094d\u0915","page":"SM_PAGE13","type":"","url":"contact","icon":"","children":[],"activeClass":""}]
  • मुख्यपृष्ठ
  • उपक्रम
    • वर्ग
    • कार्यक्रम
    • स्पर्धा
  • आगामी कार्यक्रम
  • प्रेस रिलीज
  • संपर्क

अधिक माहितीसाठी

पनवेल कल्चरल सेंटरच्या संगीत नृत्य आणि कला विद्यालयाच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन

समाजासाठी चांगलं काही करणार्‍या व्यक्ती वा समाज यांच्या पाठीशी समाज आजही उभा राहतो हे नुकतंच पुन्हा एकवार सिद्ध झालं. निमित्त झालं ते पनवेल कल्चरल सेंटर संचालित पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत नृत्य आणि कला विद्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील विस्तारित कक्षाच्या उद्घाटनाचे. हे उद्घाटन नुकतेच सुप्रसिद्ध उद्योजक आणि संस्थेचे हितचिंतक विलास कोठारी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी गानगुरु पं. मेघनाथ कोल्हापुरे आणि पं. बाबादास तुपे आवर्जून उपस्थित होते. आजकाल पनवेल-नव्या मुंबईतील जागांना आलेले महत्व, जागांची कमतरता व त्यामुळे जागांच्या भरमसाठी किंमती, जगांवरुन होणारे कलह, कोर्ट-कचेर्‍या या सगळ्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम व्यावसायिक विलास कोठारी यांनी व्ही. के. हायस्कूलजवळच्या आशीर्वाद इमाारतीतील स्वत:ची जवळजवळ एक हजार चौरस फुटाची जागा पनवेल कल्चरल सेंटरच्या संगीत विद्यालयास कोणताही मोबदला न घेता वापरायला दिली याबद्दल त्यांचे शहरात कौतुक होत आहे. तळोजा येथील व्हिस्टा प्रोसेस्ड फूडस् प्रा. लि. या कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून दिलेल्या देणगीतून या जागेचे नूतनीकरण-सुशोभिकरण करण्यात आले. उद्घाटनानंतर विद्यालयातील नियोजित भरतनाट्यम शिक्षिका सई जोशी यांचे भरतनाट्यम सादरीकरण तसेच सतार शिक्षिका पल्लवी कुमार यांचे सतार वादन झाले. त्यांना तबला साथ राहुल पेठे यांनी केली. यानंतर नियोजित बासरी शिक्षक प्रसन्न जोशी यांचे बासरी वादन झाले. त्यांना संस्थेच्या विद्यालयातील तबला शिक्षक संतोष मसणे आणि पं. किशोर पांडे यांनी तबला साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन हिंदुपूर यांनी केले. याप्रसंगी संस्थेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून अनेक मान्यवर सभासदांनी संस्थेला विविध वाद्यांची देणगी दिली आहे. आपल्या या विद्यालयात शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, हार्मोनियम, तबला, कथक, चित्रकला इ. याआधी सुरू असलेल्या विषयांबरोबरच आता यावर्षीपासून सतार, गिटार, बासरी, कीबोर्ड (सिंथेसायझर), व्हायोलिन आणि भरतनाट्यमचे वर्गही सुरू होत असून त्यांची प्रवेश प्रक्रिया एक जूनपासून सुरू झाली आहे. विद्यालयातील प्रवेशांसाठी संपर्क - मधुरा सोहनी - प्राचार्य. Mob. 99207 18745

Quick Links

  • मुख्यपृष्ठ
  • प्रेस रिलीज
  • स्पर्धा
  • संपर्क
  • about-event
  • new-event

  • वर्ग
  • आगामी कार्यक्रम
  • कार्यक्रम
  • उपक्रम
  • about-event-gatha

पनवेल कल्चरल सेंटर

१९९१ मध्ये संस्थेने गायन वादन विद्यालय सुरू केले. विद्यालयातून संस्थेला आर्थिक प्राप्ती व्हावी हा उद्देशच नसल्याने विद्यार्थ्यांकडून मिळणार्‍या फीपैकी ७५% शिक्षकांना मानधन म्हणून देण्यात येते. संस्था अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न असून गांधर्व महाविद्यालयाचे अधिकृत परीक्षा केंद्रही आहे.

Total Visitors: 0

Made with WEBWEB AI