सुरुवातीची १० वर्षे संस्थेचे संगीत विद्यालय आणि कार्यालय भाड्याच्या जागेत कार्यरत होते. १९९९ मध्ये संस्थेने स्वत:ची जागा खरेदी केली. पनवेलमधील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी म्हणजे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलाशेजारी आणि साडेचौदा कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण सुरू असलेल्या वडाळे (बल्लाळेश्वर) तलावासमोर असलेल्या संस्थेच्या याच जागेत गायन-वादन-नृत्य विद्यालय आणि सर्व छोटे उपक्रम पार पडतात. आता संस्थेला वेध लागले आहेत ते अधिक प्रशस्त आणि अधिक सुविधायुक्त वास्तूचे. लवकरच तेही स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत. अजय भाटवडेकर या संस्थेचे अध्यक्ष असून जयंत टिळक कार्यवाहपदाचा तर अनिरुद्ध भातखण्डे हे कोषाध्यक्षपदाचा भार सांभाळत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेले नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर तसेच नंदकुमार गोगटे, मोहन शिरोडकर आणि जगन्नाथ जोशी या संस्थेचे सल्लागार आहेत. संस्थेच्या पहिल्या व दुसर्या फळीतील कार्यकर्ते आजही क्रियाशील असणे ही संस्थेची मोठीच जमेची बाजू आहे.
सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने 32 वर्षे कार्यरत असणारी पनवेल कल्चरल सेंटर ही केवळ पनवेलच नाही तर रायगडमधील एकमेव संस्था असावी. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावार २७ एप्रिल १९९० रोजी सायं. ६.०० वा. डोंबिवली येथील ज्येष्ठ संगीत शिक्षक आणि नूतन संगीत विद्यालयाचे संचालक कृष्णराव दसक्कर यांच्या शुभहस्ते व्ही. के. हायस्कूलच्या ए. व्ही. हॉलमध्ये अगदी निवडक संगीतप्रेमी मंडळींच्या उपस्थितीत या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. जयंत टिळक, प्रकाश भारद्वाज, मिलींद पर्वते आणि अजय भाटवडेकर यांनी संस्थेचं रोपटं लावलं, श्रीधर सप्रे, चंद्रकांत मने, नंदू भिडे, मिलींद लिमये यांनी त्याला खतपाणी घातलं आणि डॉ. म. गौ. जोशी, जगन्नाथ जोशी, नंदकुमार गोगटे, आनंद गोखले यांनी त्याला बहर आणला. पनवेलचा सांस्कृतिक मानदंड मानली जाणारी व गेली ३२ वर्षे पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेली पनवेल कल्चरल असोसिएशन ही संस्था संस्था संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि कला अशा पाच विविध कलांचे आविष्कार सदस्यांसाठी सादर करते. संस्थेने आयोजित केलेल्या मैफलींच्या संख्येने दीड शतक पार केले आहे. २६ वर्षे सातत्याने राज्यस्तरीय ख्याल गायन स्पर्धेचे, १३ वर्षे राज्यस्तरीय तबला वादन स्पर्धेचे, १८ वर्षे तालुकास्तरीय आंतरशालेय वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन संस्थेने केले असून संस्थेचे संगीत व कला विद्यालय गेली ३० वर्षे अव्याहतपणे संस्थेच्या स्वत:च्या सुसज्ज जागेत ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सुरू आहे. या विद्यालयात २५०हून अधिक विद्यार्थी शास्त्रीय गायन-वादन-कथ्थक, सुगम संगीत आणि चित्रकलेचे शिक्षण घेत आहेत.
सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने ३० वर्षे कार्यरत असणारी केवळ पनवेलच नाही तर रायगडमधील ही एकमेव संस्था असावी. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावार २७ एप्रिल १९९० रोजी सायं. ६.०० वा. डोंबिवली येथील ज्येष्ठ संगीतशिक्षक आणि नूतन संगीत विद्यालयाचे संचालक कृष्णराव दसक्कर यांच्या शुभहस्ते व्ही. के. हायस्कूलच्या ए. व्ही. हॉलमध्ये अगदी निवडक संगीतप्रेमी मंडळींच्या उपस्थितीत या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. याप्रसंगी पनवेलमध्ये अनेक वर्षे संगीताचे अध्यापन करणार्या स्व. शैलजा तळेकर आणि सुधा उपाध्ये या दोघी आवर्जून उपस्थित होत्या. जयंत टिळक, प्रकाश भारद्वाज, मिलींद पर्वते आणि अजय भाटवडेकर यांनी संस्थेचं रोपटं लावलं, श्रीधर सप्रे, चंद्रकांत मने, नंदू भिडे, मिलींद लिमये यांनी त्याला खतपाणी घातलं आणि डॉ. म. गौ. जोशी, जगन्नाथ जोशी, नंदकुमार गोगटे, आनंद गोखले यांनी त्याला बहर आणला.
१९९१ मध्ये संस्थेने गायन वादन विद्यालय सुरू केले. विद्यालयातून संस्थेला आर्थिक प्राप्ती व्हावी हा उद्देशच नसल्याने विद्यार्थ्यांकडून मिळणार्या फीपैकी ७५% शिक्षकांना मानधन म्हणून देण्यात येते. संस्था अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न असून गांधर्व महाविद्यालयाचे अधिकृत परीक्षा केंद्रही आहे.
१९९२ पासून संस्थेने राज्यस्तरीय ख्याल गायन स्पर्धेचे आयोजन सुरू केले. अल्पावधीतच या उपक्रमाने पनवेल म्युझिक सर्कलला महाराष्ट्रभर ओळख मिळवून दिली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केलेले वरदा धारप, अंजली बसोले, डॉ. अद्वैत दीक्षित, ओंकार दादरकर, विश्वजीत बोरवणकर, भक्ती करंदीकर, सचिन नेवपूरकर, रवींद्र परचुरे हे आता व्यावसायिक गायक म्हणून ओळखले जातात.
२००२ पासून संस्थेतर्फे राज्यस्तरीय तबला वादन स्पर्धेचेही आयोजन करण्यात येऊ लागले. आजवर या स्पर्धेत ज्यांनी पारितोषिके पटकावली ते स्वप्निल भिसे, विश्वनाथ जोशी, रोहित नाटेकर, महेश गाडवे, प्रसाद पाध्ये इ. आज व्यावसायिक दर्जाचे तबलावादक म्हणून ओळखले जात आहेत. २००२ पासून संस्थेतर्फे पनवेल तालुका स्तरावर आंतरशालेय निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात येऊ लागले. या स्पर्धेचा सुरुवातीपासून आजवरचा सर्व खर्च संस्थेचे माजी अध्यक्ष नंदकुमार गोगटे करीत आले आहेत. संस्थेच्या विद्यालयात चित्रकलेचं अध्यापन करणार्या गोगटे सरांचं आणखी एक मोठेपण म्हणजे त्यांना संस्थेकडून कलाशिक्षक म्हणून मिळणारं सर्व मानधन ते संस्थेला देणगी म्हणून देतात. अशा प्रकारे त्यांनी आजवर संस्थेला पाच लाखाहून अधिक देणगी दिली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत गेली अनेक वर्षे विद्यालयाचे व्यवस्थापन बघणारे जगन्नाथ जोशी यांनीही विद्यालयाचे व्यवस्थापक म्हणून त्यांना मिळालेले एक लाख रुपये मानधन त्यात काही भर टाकून संस्थेला देणगीस्वरूपात परत दिले आहेत.