गाथा नवरसांची..
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन हा महाराष्ट्रभर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पनवेल कल्चरल सेंटर ‘गाथा नवरसांची’ हा कार्यक्रम सादर करीत असून यात साहित्यातील नवरसांचा आविष्कार अनुभवता येईल. कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन वैशाली केतकर यांचे असून लेखन निलीमा देशपांडे यांनी केले आहे. यात वैशाली केतकर, स्वप्ना पेंढारकर, रेणुका दलाल कथा-कविता-स्वगत आणि गीते सादर करतील. तर ओमकार भुवड गाण्यांना तबलासाथ करील. हा कार्यक्रम रविवार, दिनांक 2 मार्च 2025, सायंकाळी 6.00 वा. पनवेल कल्चरल सेंटरचे सभागृह, प्रबोधनकार ठाकरे मार्ग, पनवेल येथे होत असून तो सर्व साहित्यप्रेमींसाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : वैशाली केतकर 99204 11149.